पुणे : पुणे आणि परिसरातील पर्यटन प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. यावर्षी जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली असली तरी जुलैच्या पहिल्याच तारखेपासून महाराष्ट्रात धो धो पावसाला सुरुवात झाली. अशातच आता वीकेंडला पुणेकरांच्या फिरण्यासाठी आवडीची जागा म्हणजे भुशी डॅम ! पावसानं चांगली हजेरी लावल्यामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लोव झाला आहे. !
पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी पावसाळ्यामध्ये आवडीच्या ठिकाणांपैकी भुशी डॅम हे एक आहे. विकेंड असल्यामुळे तुम्हीही जर पर्यटनासाठी ठिकाण शोधत असाल तर भुशी डॅम हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. लोणावळ्यात असलेल्या भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाणी ओवर फ्लो झाले आहे. अनेकांना या पाण्यामध्ये खेळण्याचा मोह आवरता येत नाही. तर लोणावळ्यापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग देखील अनेक पर्यटकांना सध्या आकर्षित करतो आहे.
लोणावळ्यामध्ये इतर अनेक पर्यटनासाठी ठिकाणे आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर लोणावळ्याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे वीकेंडसाठी भुशी डॅम हा आपल्याला उत्तम पर्याय ठरू शकतो.