BEED NEWS: 3 राज्यात चोरी करणाऱ्या चोरट्याला बीड पोलिसांनी केली कल्याणमध्ये अटक - टॉप न्यूज मराठी

महागड्या वस्तूंना लक्ष करून अत्यंत सराईतपणे चोरणारा कल्याणच्या एका चोरट्याला बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

बीडच्या साई मोबाईल शॉपी मध्ये लाखो रुपये किमतीचे महागडे फोन चोरले होते. सीसीटीव्ही च्या  आधारे 

त्याला कल्याण मधून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. रामानिवास मंजू गुप्ता असे या चोरट्याचे नाव आहे. 

महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात पोलिसांना तो हवा होता. त्याने आतापर्यंत 35 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे केले आहेत. 

तो कुठल्याही टोळीशी निगडित नाही. देशभरात जाऊन तो एकटाच चोरीच्या घटना करतो. त्यामुळे इतर राज्यातील देखील पोलिसांना त्याने आव्हान दिले होते.

 अखेर बीड पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.