BEED CRIME : बीडमध्ये कला केंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; दहा जण ताब्यात, एक फरार - टॉप न्यूज मराठी

बीड : बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथील बेकायदेशीर कला केंद्रावर नेकनूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ८ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतल आहे. दरम्यान घटनास्थळावरून एक आरोपी फरार झाला आहे. 

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पोलिसांना या बेकायदेशीर कलाकेंद्र विषयी गोपनीय माहिती मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्या संयुक्त पथकाने कला केंद्रावर अचानक छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये आरिफ असिफ शेख आणि शफिक अली मोमीन हे दोघेजण हे कला केंद्र विनापरवाना चालवत असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी आठ महिला आणि दोन पुरुष ताब्यात घेण्यात आले असून एक जण फरार झाला आहे. 

याप्रकरणी आता संबंधित आरोपींविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कला केंद्राच्या माध्यमातून इतर बेकायदेशीर व्यवहार सुरू होते का? याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.