पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एटीएसने मोठी कारवाई करून धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान आज पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातून पोलिसांनी 45 जणांना ताब्यात घेतले आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा तरुणांना पैशाचे आमिष दाखवून अशा मुलांना फुस लावून त्यांच्याकडून स्थानिक एजंट म्हणून काम करून घेण्यासाठी या मुलांच नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ATS किंवा पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
नेमकं प्रकरण काय
पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक सध्या राज्यात मोठे झाड सत्र राबवत आहे. दरम्यान आज पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातून 45 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
कोण आहे शहजाद भट्टी
शहजाद भट्टी हा एक पाकिस्तानी गँगस्टर आहे. दुबईतून तो आपले नेटवर्क चालवतो अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही तरुण आर्थिक आमिषापोटी त्याच्याकडे आकर्षित होत असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर एटीएसने ही कारवाई सुरू केली. या अटक करण्यात आलेल्या तरुणांकडून लॅपटॉप, मोबाईल ,पेन ड्राईव्ह असे तांत्रिक साधने जप्त करण्यात येत आहेत. आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा तरुणांना पैशाचे आमिष दाखवून अशा मुलांना फुस लावून त्यांच्याकडून स्थानिक एजंट म्हणून काम करून घेण्यासाठी या मुलांच नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. अशी माहिती मिळाली असून गुप्त माहिती गोळा करणे, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रपुरवठा अशा गंभीर प्रकरणांबाबत देखील तपासणी सुरू असून एटीएस सतर्क झाली आहे.