ANANTRAO THOPTE PASSES AWAY; माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन - टॉप न्यूज मराठी

पुणे जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात 1980 आणि 90 च्या दशकामध्ये दबदबा असलेले

माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन. ते 93 वर्षांचे होते.

अनंतराव थोपटे राज्याचे दुग्धविकास मंत्री, शिक्षण मंत्री राहिले. तब्बल तेरा वर्ष ते पुण्याचे पालकमंत्री होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील कट्टर विरोधक. अनंतराव थोपटे आणि प्रा. रामकृष्ण मोरे या जोड गोळीचे  पुणे जिल्ह्यावर अनेक वर्षे वर्चस्व  होते. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांवर त्यांचे अधिपत होते.

अनंतराव थोपटे  सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत असतानाच 1999 मध्ये थोपटे यांचा काशिनाथ खुटवड यांनी पराभव केला होता. अनंतराव थोपटे यांची राजकीय कारकीर्द आणि कार्यकर्त्यांची फळी आजही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आहे.

वृद्धापकाळमुळे गेले महिनाभर ते दीनानाथ रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. दोन दिवसापासून त्यांची तब्येत खालावली. अखेर त्यांचे आज निधन झाले.