पुणे : खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज ७ जुलैला सकाळी १०:०० वाजता ७६% टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या काही तासांत धरण ८०% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
-प्रशासनाने नदीपात्राजवळच्या रहिवाश्यांना आणि नागरिकांना नदीपात्रात उतरू नये असा सावधानतेचा इशारा दिला आहे.
-तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
-सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.
-सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.