Alert : खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 27 हजार क्युसेकने विसर्ग सुरू; नदीपात्र जवळील रहिवाशांनी सतर्क रहा - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुण्याच्या खडकवासला धरण परिसरामध्ये अति पर्जन्यमानामुळे आज पहाटे पासूनच 22880 क्यूसेंन विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान तो विसर्ग वाढवून आता 27 हजार 203 क्यूसेक इतका करण्यात आला आहे. तर पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीपात्र जवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

मुठा नदीमध्ये आता पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पावसाचा जोर देखील जास्त असल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात जर काही तत्सम साहित्य किंवा जनावरे असतील तर ती हलवण्यात यावीत आणि नदीपात्रा जवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

त्याचबरोबर कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून देखील 4495 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कासारसाई धरण हे सध्या 99% भरले आहे.

आंद्रा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता आंद्रा धरण अंदाजे 75% भरलेले आहे. सध्या धरणातून सांडवा अथवा ICPO द्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही. तथापि धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने व येत्या काही तासात काळात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास आंद्रा धरणाच्या द्वारविरहित सांडव्याद्वारे Ungated Spillway येत्या काही तासात अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आंद्रा धरणाखालील नदीकाठच्या गावांना, तसेच इंद्रायणी नदी व सुधा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.