AKOLA NEWS | अकोल्यातील म्हैसपूर शेतशिवारात आढळला 15 लांबीचा अजगर; ‎वनविभागाकडून थरारक रेस्क्यू ऑपरेशन - टॉप न्यूज मराठी

अकोल्यातून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. अकोला शहराजवळील म्हैसपूर शिवारात रात्रीच्या सुमारास एका अजगराने सर्वांचीच गाळण उडवली. तब्बल १५ फूट लांब अजगर शेतात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार, अकोल्याच्या म्हैसपूर शिवारात रात्रीच्या वेळी थरार पाहायला मिळाला. शेती सपाटीकरणाचे काम सुरू असताना अचानक १५ फूट लांबीचा अवाढव्य अजगर समोर आला.या अजगराला पाहताच मजुरांची मोठी धावपळ उडाली आणि काम काही काळासाठी थांबवावे लागले. अखेर वनविभाग आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत या अजगराला सुरक्षितपणे जेरबंद केले. अजगराला रेस्क्यू केल्यामुळे आता या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

‎