AKOLA MURTIJAPUR NEWS : अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघात - टॉप न्यूज मराठी

अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे. 

मूर्तिजापूर शहरातील पॉप्युलर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला असून OD 17 AH5017 क्रमांकाचा लोखंडी रोडची वाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगात जात 

असताना चालकाला झोप अनावर झाली व ट्रक वरील नियंत्रण सुटलं... 

यानंतर या ट्रकने रस्त्यालगत असलेल्या स्ट्रीट लाईटचे खांब अक्षरशः उडवले... 

इतकेच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध असलेला डिफायडर तोडून हा ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन अडकला. 

 हा ट्रक नागपूर वरून गुजरातच्या दिशेने जात होता. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालक मात्र गंभीर जखमी झालाय...