ACCIDENT : मुंबईमध्ये भीषण अपघात; कारवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू, आठ जण गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान - टॉप न्यूज मराठी

मुंबई : एकीकडे मुंबईमध्ये पावसानं थैमान घातलंय तर आता मुंबई उपनगरातील तळोजा सेक्टर 10 मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू ओढवला आहे. त्यासह अनेक वाहनांचे देखील नुकसान झाल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आठ ते दहा जणांना या कारचालकाने उडवले आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर आठ जखमी आहेत. जखमींना सध्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये नदीम खान वय वर्ष 35 या युवकाचा मृत्यू झाला आहे.  

दरम्यान घटना घडल्यानंतर कार चालकाने कार सोडून पलायन केले आहे. या अपघातामध्ये जीवित हानी तर झालीच आहे. परंतु त्यासह अनेक वाहनांचे नुकसान देखील मोठे झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.