7 आणि 8 जुलैला पालखी प्रस्थान ! पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दीतून किंवा त्यापुढे सहभागी व्हावे, प्रशासनाचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

पुणे : श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक 7 व 8 जुलै रोजी देहू व आळंदी येथून होणार आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दी अथवा त्यापुढे पासून सहभागी व्हावे असे जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. मुंबई वेधशाळा हवामान अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात दिनांक ६ जुलैला रेड अलर्ट दिला असून त्याप्रमाणे देहू व आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणी साठा वाढला आहे. 

आळंदीतील प्रमुख 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर सुरूच आहे. इंद्रायणी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलीय आहे. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक 7 व 8 जुलै रोजी देहू व आळंदी येथून होणार आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दी अथवा त्यापुढे पासून सहभागी व्हावे असे जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबात सर्वांनी सयंम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.