मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील ढगफुटी सारखे मोठे परिणाम दिसून येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील ढगफुटी झाली आणि सहा खासदार आणि एक आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. तर आता सप्टेंबर पर्यंत तब्बल 15 आमदार आणि 25 नगरसेवक जायच्या मार्गावर असल्याचं बोललं जातं आहे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झालेल्या या धडापडीनंतर काल ठाकरे यांनी आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. ठाकरे यांनी एकीकडे पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करण्याचे सुरू केलेले दिसत आहे. परंतु अजूनही ही धडपड फक्त सुरुवात होती की काय असा प्रश्न आता पडतो आहे. हिंदुस्तानी भाऊ हे एक रिल स्टार आहेत. त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिला आहे.
रील स्टार हिंदुस्थानी भाऊ यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशाराच दिला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना थेट भांडुपचा अनिल कपूर म्हंटले आहे. ते म्हणाले कि, "उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, माहितीय ना? मी मध्ये बोललेलो होतो ना..सांभाळा नाही तर पंधरा आमदार आणि 25 नगरसेवक जायच्या मागे आहेत. सचिन आहिर यांनी पहिला बॉम्ब फोडला. सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबरची 7 तारीख लक्षात ठेवा.. खूप काही जाणार आहे.. तुमचा अनिल कपूर काय बोलतो आहे? तुडवा ऑपरेशन चालू करणार.. अरे सचिन आहिर कोण आहे? दगडी चाळीचे नाव ऐकले आहे का? सात रस्ता, दगडी चाळ… अरूण गवळी ऊर्फ डॅडी… बाळासाहेब काय बोलायचे… तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे… सप्टेंबरच्या 7 तारखेला मोठे तब्बल 15 आमदार जाणार" असा थेट इशारा हिंदुस्थानी भाऊने दिला आहे.
https://www.instagram.com/p/DaactCbtVeD/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again