2 कोटीचा 'हनुमान अंश' ठरला 2026 चा ब्लॉकबस्टर, जमवला 60 कोटींचा गल्ला; 'टॉक्सिक' आणि 'आवारापन 2' मोठ्या स्टारकास्टसह धडपडले... - टॉप न्यूज मराठी

केवळ 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'हनुमान अंश' हा 2026 मधील सर्वात फायदेशीर चित्रपट ठरला आहे. रिलीजला 27 दिवस झाले तरी बॉक्स ऑफिसवर त्याची घौडदौड सुरूच आहे.

कोणत्या सिनेमांसोबत रिलीज झाला ?

'हनुमान अंश' जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याच्यासमोर साऊथ सुपरस्टार यशचा बिग बजेट 'टॉक्सिक', इमरान हाश्मीचा 'आवारापन 2' आणि 'बटवारा' हे मोठे सिनेमे होते. पहिल्या दिवशी त्याने फक्त 10 लाख कमावले होते आणि पहिल्या 2 आठवड्यात केवळ 1.48 कोटी गल्ला केला होता. पण तिसऱ्या आठवड्यापासून वर्ड ऑफ माऊथ मुळे चित्र पालटले.

आतापर्यंतचे कलेक्शन 

'हनुमान अंश' : 27 व्या दिवशी बुधवारी 7,037 शोजमधून 7.25 कोटी कमावले. 26 व्या दिवशी 8.50 कोटींची कमाई झाली होती. आतापर्यंत भारतात नेट 61.38 कोटी आणि ग्रॉस 72.32 कोटींचा गल्ला केला आहे. 24 व्या दिवशी तर एकाच दिवशी 12.75 कोटींची सर्वाधिक कमाई केली.'हनुमान अंश' मध्ये कोणताही मोठा स्टार नाही, पण नीम करोली बाबा यांच्यावरील कथानक आणि 'मोरे संकट के कटैया' हे व्हायरल गाणं लोकांच्या मनाला भिडले. बुंदेलखंडचे गायक सुनील लोधी यांच्या आवाजाने गाणं हिट झाले. कमी बजेट, मोठा आशय हेच या सिनेमाच्या यशाचे गमक ठरले.

Toxic (टॉक्सिक) - यश

यशचा हा सिनेमा 300 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून अपेक्षेप्रमाणे चालला नाही. 27 दिवसांत सुमारे 45 कोटींवरच थांबला. 300 कोटीच्या बिग बजेटमध्ये बनलेला हा पॅन-इंडिया ॲक्शन थ्रिलर आहे. यशची एन्ट्री आणि ॲक्शन सीन्स जबरदस्त आहेत, पण कथा खूपच रटाळ आणि प्रेडिक्टेबल आहे. दिग्दर्शनात नाविन्य नाही. फक्त यशच्या फॅन्ससाठी वन टाइम वॉच. 

रेटिंग: 2.5/5

Awarapan 2 (आवारापन 2) - इमरान हाश्मी 

इमरान हाश्मीच्या या सिनेमाने चांगली सुरुवात केली पण नंतर गती मंदावली. कलेक्शन 35 कोटींच्या आसपास आहे.17 वर्षांनंतर आलेला सिक्वेल इमोशन आणि जुन्या गाण्यांच्या नॉस्टॅल्जियावर चालतो. इमरानने अभिनयात जीव ओतला आहे, पण पहिल्या भागाची जादू यात नाही. दुसरा हाफ खूपच स्लो आहे. क्लायमॅक्स मात्र हृदयाला भिडतो. 

रेटिंग: 3/5

3.Batwara (बटवारा) - फॅमिली ड्रामा

हा सिनेमा पूर्णपणे आपटला असून 10 कोटींचाही आकडा पार करू शकला नाही. जमिनीच्या वाटणीवरून दोन भावांमधील वादावर आधारित ग्रामीण कथा. विषय चांगला आहे पण ट्रीटमेंट खूपच जुन्या पद्धतीची आहे. अभिनय ठीक-ठाक, पण पटकथा भरकटते. OTT वर बघण्यासारखा. 

रेटिंग: 2/5