15 ऑगस्ट निमित्त उद्या लक्षात ठेवा ! तिरंग्याचा सन्मान सर्वात आधी ; तिरंगा फडकवण्याचे 7 महत्वाचे नियम - टॉप न्यूज मराठी

'भारतीय ध्वज संहिता 2002' : 15 ऑगस्ट म्हणजे अभिमानाचा दिवस. घर, शाळा, ऑफिस सगळीकडे तिरंगा डौलाने फडकतो. पण देशाचा मानबिंदू असलेल्या तिरंग्याचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. तिरंगा फडकवताना 'भारतीय ध्वज संहिता 2002' मधील नियम पाळणे बंधनकारक आहे. चला जाणून घेऊया कोणते नियम आहेत.

तिरंगा फडकवण्याचे 7 महत्वाचे नियम:

1. केव्हा फडकवायचा ?

सकाळी सूर्योदयानंतर झेंडा फडकवावा आणि सूर्यास्तापूर्वी उतरवावा. 

2. कुठे लावायचा? 

झेंडा नेहमी उंच जागी आणि मोकळ्या जागेत फडकवावा. इतर कोणत्याही झेंड्यापेक्षा तिरंगा उंच असावा.

3. झेंडा फाटका नसावा

फाटलेला, मळलेला किंवा रंग उडालेला झेंडा वापरू नये. आवश्यकतेनुसार सन्मानाने जुना झेंडा विसर्जित करावा.

4. जमिनीला स्पर्श नको 

झेंडा कधीही जमिनीला, पाण्याला स्पर्श होता कामा नये.

5. इतर वापरावर बंदी 

तिरंग्याचा वापर कपडे, उशी, रुमाल किंवा पिशवी बनवण्यासाठी करता येत नाही. तिरंग्यावर कोणतेही शब्द किंवा जाहिरात लिहिता येत नाही.

6. वाहनावर कसा लावावा ? 

फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या गाडीवरच झेंडा लावण्याची परवानगी आहे. सामान्य नागरिकांनी गाडीच्या काचेवर स्टिकर लावू शकता.

7. प्लास्टिकच्या झेंड्याचे काय ? 

कार्यक्रमानंतर प्लास्टिकचे झेंडे रस्त्यावर फेकू नयेत. जपून ठेवा ! 

तिरंगा हा शौर्य, त्याग आणि एकतेचे प्रतीक आहे. 15 ऑगस्टला तिरंगा हातात घेऊन सेल्फी काढण्याआधी त्याचा सन्मान करणे महत्वाचे आहे. चला, या स्वातंत्र्यदिनी नियम पाळून तिरंग्याचा मान वाढवूया.

जय हिंद ! वंदे मातरम !