12 वर्षीय मुलीवर मित्राकडून कॅफेमध्ये अत्याचार; पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये धक्कादायक प्रकार - टॉप न्यूज मराठी

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्रानं अत्याचार करून तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

गांभीर्याची बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर तळेगाव दाभाडे येथीलच टीका कॅफेमध्ये अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह एका कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीचे काही अश्लील फोटो मुलाने सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

 त्याप्रकरणी तिने व तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना मुलीवर कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. तिथे असे गैरप्रकार सुरू असल्याचं निष्पन्न झालं.

त्यामुळे पोलिसांनी कॅफे मालकालाही या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. तर मुलीवर अत्याचार करणारा तिचा मित्र हा या प्रकरणातला मुख्य आरोग्य आहे. दरम्यान या घटनेमुळे महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा सर्व कॅफेंची आणि हॉटेल्सची कसून चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.