1 जूनपासून “हे” 7 नियम बदलणार: सर्वसामान्यांच बजेट कोसळणार. - टॉप न्यूज मराठी

जून महिन्याची सुरुवात महागाईसोबतच झाली आहे. LPG सिलिंडर आणि मारुती कारच्या दारांबरोबरच UPI पेमेंट, ATM व्यवहार शुल्क, पॅन कार्ड नियमांमध्येही काही बदल झाले आहेत. 

नवीन महिना सुरू झाला आहे आणि त्यासोबतच देशभरात नवीन बदलही लागू झाले आहेत ज्यांचा परिणाम सर्वसामान्यांनच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. आज पासून फक्त LPG सिलिंडर आणि मारुती करच्या किमती बदलल्या नाहीत, तर यूपीआय पेमेंट एटीएम व्यवहार, सौर पॅनल नियम आणि पान कार्ड नियमांमध्ये ही बादल आणण्यात आले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून गॅस आणि तेलामध्ये दरवाढीचा स्फोट होत असून 1 जुनेच्या सकाळी पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडर महाग झाला आहे. व्यावसायिक एलपईजि सिलिंदरचा दर 42 रुपयांनी वाढला असून 5 किलो मिनी सिलिंदरचे दरही 11 रुपये महाग झाला आहे. मुंबईमध्ये आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडरची किंमत 3,067,50 रुपये झाली आहे. तर त्यासोबतच 14.2 किलोच घरगुती सिलिंडरची किंमत 912.50 रुपयांवर स्थिर राहिली असून पांच किलोच एलपईजि मिनी सिलिंडर 339 रुपयांना मिळत आहे. 

 एलपईजी व PNG बाबत नवे नियम 

पेट्रोलियम गॅस कनेक्शनबाबत 1 जुनेपासून एक मोठा बदल लागू केला आहे. यानुसार ज्या घरांना पीएनजी म्हणजे पाईपे गॅस मिळेल, त्यांना आता 30 दिवसांच्या आत एलपईजि कनेक्शन परत करावे लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी, इंडेन, भारत गॅस आणि HP गॅस यांसारख्या कंपन्या कनेक्शन ट्रान्सफर व्हाउचर प्रणाली सुरू करत आहेत. या प्रणालीअंतर्गत, लोक सध्या त्यांचे एलपईजि कनेक्शन सरेंडर करू शकतात. नंतर PNG नसलेल्या भागात स्थलांतरित झाले,तर त्यांचे एलपीजी कनेक्शन पुन्हा कनेक्ट करू शकतील. 

मारुती आणि ह्युंदाईच्या गाड्यांच्या दरात वाढ 

मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर इंडियाच्या गाड्यांच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या किमती जूनपासून 30,000रुपयांपर्यंत वाढतील जी मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल. याशिवाय ह्युंदाई मोटर इंडियानेही आपल्या पोरतोफऑलिओमध्ये 12,800 रुपयांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. 

रेल्वे मार्गांमध्ये बदल 

भारतीय रेल्वे जून 2026 मध्ये मोठा रेल्वे ब्लॉक लागू करणार आहे. अंदाजे 77 गाड्या रद्द होतील आणि इतर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल होईल. भारतीय रेल्वेच्या या बदलांचा परिणाम पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा यासह अनेक राज्यांवर होईल. अनेक सुपरफास्ट आणि दुरंतो गाड्यांच्या वेळा आणि मार्गांमध्येही बदल केले गेले आहेत. 

पॅन कार्डचे नियम 

आजपासून पॅन कार्डचेही नियम बदलले आहेत. यापूर्वी एक दिवसांत 50000 रुपयेपेक्षा जास्त रोख जमा करण्यासाठी पॅन कार्ड देणे आवश्यक होते, पण आता ही अट रद्द केली आहे. मालमत्तेच्या खरेदी आणि विक्रीसाठी पॅन मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपयांवर वाढली गेली आहे. वार्षिक 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी देखील पॅन रेपोर्टिंग लागू होईल. 

नवे सौर पॅनल नियम 

1 जून 2026 पासून सौर पॅनलसाठी नवीन ALMM (मॉडेल्स आणि उत्पादकांची मान्यताप्राप्त यादी) नियम लागू होतील. या नियमांनुसार, सरकारी योजना, नेट-मिटरिंग आणि विवध अनुदानित प्रकालपांमध्ये आता ALMM यादी-1 आणि यादी-2 मध्ये सूचीबद्ध असलेल्या सुर मॉड्यूल्स आणि सेल्सचा वापर करणे आवश्यक असेल. सरकारने स्पष्ट केले आहे की 1 जूननंतर ALMM यादी-2 च्या नियमांना कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. 

ATM कॅश विड्रॉल शुल्कात बदल

अनेक बँकांनी एटीएम आणि बँकिंग नियमांमध्ये बदल केले होते तर आता, 1 जूनपासून , काही बँका एटीएम व्यवहार शुल्क, मोफत व्यवहार मर्यादा आणि कॅश विड्रॉलच्या नियमांमध्ये बदल करणार आहेत. एप्रिल 2026 पासून एचडीएफसी बँकेने मोफत एटीएम मर्यादामध्ये UPI एटीएममधून रोख रक्कम काढण्याचा समावेश केला आहे, तर पंजाब नॅशनल बँकेने काही कार्डवरील दैनंदिन रोख रक्कम काढण्याची मर्यादा केली आहे. 

 

 #topnewsmarathi #breakingnews #topnews #newrules #lpgcyclinder