गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्यामध्येच आता एक रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. 60 ते 70 मुले मुली झिंगाट झाली होती.
पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत 60 ते 70 तरुण सहभागी होते. या पार्टीचे नाव ‘प्रोजेक्ट एक्स’ असे होते. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी ज्यावेळी या रेव्ह पार्टीवर छापेमारी केली, त्यावेळी सर्व तरुण तरुणी नशेत होते. अंमली पदार्थांचे सेवन या तरुण तरुणींना केल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. या पार्टीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाने अंमली पदार्थ कुठून आले, याचा शोध पोलिस घेत आहेत. पार्टीमध्ये दारू विक्री ही सुरू होती. परवानगी शिवाय ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. एका बंगल्यावर या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीतील तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी सुरू आहे.
रेव्ह पार्टी म्हणजे सहसा रात्रीच्या वेळी किंवा गुप्त ठिकाणी आयोजित केली जाणारी एक अनधिकृत संगीत आणि नृत्य पार्टी असते. यात उच्च आवाजात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक, अमली पदार्थांचा (Drugs) वापर आणि मद्यपान यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ पोलिसांनी जप्त केले. 100 टक्के या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर झाल्याच पोलिसांचा अंदाज आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याची हद्दत ही ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टी सुरू होती. मिळालेल्या माहिती नुसार 60 ते 70 तरुण तरुणी पार्टीत सहभागी असून अंमली पदार्थांचे पार्टीत सेवन केले जात आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच पथक तिथे पोहोचलं आणि त्यांने ही कारवाई केली.
जवळपास 100 पोलिस पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी संपूर्ण बांगल्याला घेरले आणि मग कारवाईला सुरुवात केली. ज्यावेळी ही कारवाई होत होती, त्यावेळी या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असलेल्या मुला मुलींना काहीच सुधरत नव्हतं. सर्वच जण नशेत होते.
या रेव्ह पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्रोजेक्ट एक्स रेव्ह पार्टीमध्ये सर्वकाही व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात दारूचा साठा देखील मिळाला आहे.
#topnewsmarathi #topnews #breakingnews #punecity #punecrime #punenews