ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' का रंगवतात? जाणून घ्या रेल्वेचं खास कारण - टॉप न्यूज मराठी

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह फक्त एक डिझाइन नसून एक महत्त्वाचा सुरक्षा नियम आहे. सोप्या भाषेत समजून घेऊया या ‘X’ चा खरा अर्थ. 

आपल्यापैकी बहुतेक लोकांनी रेल्वेने कधी ना कधी प्रवास केला असेल. पण प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एक मोठे ‘X’ चिन्ह का असतं, याचा कधी तुम्हाला विचार आला आहे का? अगदी रोज लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये जागेसाठी धक्काबुक्की करणाऱ्या प्रवाशांनाही या मागचे खरे कारण माहीत नसते. हे केवळ एक डिझाईन आहे असं समजून बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात.

 पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, ट्रेनच्या डब्यामगे असलेलं, हे केवळ एक डिझाईन नसून भारतीय रेल्वेचा एक महत्त्वाचा सुरक्षा नियम आहे. रेल्वेमार्गांवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीवनाशी ते चिन्ह संबंधित आहे. या ‘X’ चा खरं अर्थ सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊया. या चिन्हाचं मुख्य कार्य म्हणजे, स्टेशन मास्टर आणि ट्रॅकमन यांसारख्या रेल्वे कर्मचाऱ्यांना, पूर्ण ट्रेन स्टेशन किंवा ट्रॅक सुरक्षितपणे पुढे गेली आहे. हे कळवणे असतं. जर शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह दिसत असेल, तर याचा अर्थ असा होतो की कोणताही डबा मागे राहिलेला नाही. 

हे चिन्ह आपत्कालीन किंवा आपघाटी सूचने साथी देखील असतं. लक्षात ठेवा की जर एखादी ट्रेन स्टेशनवरुण निघत असेल किंवा स्टेशनवरुण जात असेल आणि तिच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह नसेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की काहीतरी गडबड आहे. म्हणजेच, वाटेत काही डब्बे मागे राहिलेले आहेत. हे पाहून. रेल्वे कर्मचारी तत्काळ आपत्कालीन सूचना जारी करतात आणि त्याच मार्गावरील इतर गाड्यांना त्वरित थांबवले जातं, जेणेकरून कोणताही मोठा अपघात होऊ नये. 

‘X’ हे चिन्ह अनेकदा चमकदार पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाने रंगवलेलं असतं. म्हणजे अगदी काळोखात, अंधारात, किंवा मुसळधार पावसात अथवा धुक्यातही ते चिन्ह दुरूनही स्पष्टपणे दिसू शकतं. रात्रीच्या वेळी, या चिन्हाच्या खाली एक लाल दिवा चमकतो. हा दिवा मागून येणाऱ्या इतर गड्यांबद्दल चालकांना सावध करतो. त्याच्या शेजारी जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर पाटीवर मोठ्या अक्षरात ‘LV’ लिहिलेलं असतं ज्याचा अर्थ ‘शेवटचे वाहन’ (Last Vehicle) असा होतो. यामुळे हा गाडीचा शेवटचा भाग आहे, याची कर्मचाऱ्यांना खात्री पटते.

#topnewsmarathi #topnews #generalknowledge #indianrailway #trending