भारत vs अफगाणिस्तान T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी BCCI ने जाहीर केला संघ; 5 मोठे बदल, 8 खेळाडू बाहेर - टॉप न्यूज मराठी

भारत vs अफगाणिस्तान T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी BCCI ने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. 13 सप्टेंबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ही मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

संघात 5 मोठे बदल, बुमराहचं कमबॅक:

दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, त्यांचे खेळणे फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असेल. तसेच संजू सॅमसनचीही संघात एन्ट्री झाली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या 8 खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यात रिंकू सिंह, सूर्यांश शेडगे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश आहे.

संघ कसा असेल ?

या मालिकेत अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ओपनिंग करतील. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशन असे दोन पर्याय आहेत. अष्टपैलू म्हणून शिवम दुबे, अक्षर पटेल तर फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि रवि बिश्नोई सांभाळतील.