त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शनासाठी आता 2 हजार 500 रुपये मोजावे लागणार - टॉप न्यूज मराठी

 त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दलालांमार्फत होणारी भाविकांची आर्थिक लूट आणि दर्शनाचा काळा बाजार रोखण्यासाठी 'ब्रेक दर्शन' (विराम दर्शन) ही नवी सशुल्क दर्शन व्यवस्था प्रस्तावित केली आहे. या व्हीआयपी (VIP) दर्शन व्यवस्थेसाठी भाविकांना अडीच हजार रुपये (₹२,५००) प्रति तिकीट मोजावे लागणार आहेत.

अडीच हजार रुपयांचे शुल्क अत्यंत महागडे असल्याने, सर्वसामान्य भाविकांमधून या निर्णयाला मोठा विरोध होण्याची आणि नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे. ट्रस्टच्या मते ही अधिकृत तिकीट प्रणाली पुढील काही दिवसांत प्रत्यक्षात लागू केली जाऊ शकते.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी भाविक आणि विविध स्तरांतून महत्त्वाच्या सुधारणांची मागणी केली जात आहे. मोफत आणि २०० रुपयांच्या सशुल्क रांगेतील अंदाजे प्रतीक्षा वेळ (Waiting Time) दर्शवणारे डिजिटल बोर्ड लावणे. भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून 'टोकन पद्धत' सुरू करणे. मंदिर उघडणे-बंद होणे, नित्यपूजा आणि रात्रीच्या आरतीची वेळ स्पष्टपणे लिहिणे. भाविकांच्या माहितीसाठी गर्भगृह नेमके कधी बंद राहणार आहे, याचे वेळापत्रक विविध कक्षांमध्ये लावणे. या मागण्यांमुळे सामान्य भाविकांचा वेळ वाचेल आणि दर्शनाचा प्रवास अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

#topnewsmarathi #topnewsmarathipune #topnewsmaharashtra #Marathibreakingnews #marathinews #marathinewslive #superfast #topnewsmarathi #marathitopnewsnews #liveblog #liveupdate #todaybreakingnews #ताज्या_बातम्या #लेटेस्ट_व्हिडिओ #topstory #मराठी_बातम्या #latestmarathinews