महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून,
वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता त्यांची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी केली जात आहे.
या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. प्राप्त माहितीनुसार,
रूपाली चाकणकर आपल्या वकिलांच्या ताफ्यासह पुण्यातून नाशिकच्या दिशेने रवाना झाल्या असून, त्यांची चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण कार्यालयात (CID Training Centre) SIT पथकाची वाहने सकाळपासूनच दाखल झाली होती.
हेच ते ठिकाण आहे जिथे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भोंदू बाबा अशोक खरात याचीही कसून चौकशी करण्यात येत होती.
आता याच ठिकाणी रूपाली चाकणकर यांचीही चौकशी केली जात आहे.
यापूर्वी प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात आली होती, त्यानंतर आता रूपाली चाकणकर यांचीही चौकशी होत आहे
'SIT चौकशीत सहकार्य करणार'
दरम्यान चौकशीसाठी हजार राहताच रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं