पुणे शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने Safe Road Pune 2026 रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील पाचही वाहतूक विभागांनी वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले.
1. चतुश्रुंगी वाहतूक विभाग - API राजकुमार केंद्रे आणि त्यांच्या टीमने औंध गाव आणि शिवाजी विद्यालय परिसरात विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिक संघाच्या मदतीने जनजागृती केली. हेल्मेट घालणाऱ्या आणि सीट बेल्ट लावणाऱ्या वाहन चालकांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.
2. फुरसुंगी वाहतूक विभाग - PI राजेंद्र करणकोट यांच्या टीमने मंतरवाडी चौकात 50 ते 55 टेम्पो चालक मालकांना मालवाहतूक करताना घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.
3. बंडगार्डन वाहतूक विभाग - API विशाल दांडगे यांच्या टीमने RTO चौक आणि शाहीर अमर शेख चौक येथे AISSMS कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत फलक दाखवून जनजागृती केली. अलंकार चौक आणि IB चौकात SJ Construction कंपनीच्या 30 स्वयंसेवकांसह यमराजाच्या वेशभूषेत पथनाट्य सादर करून विना हेल्मेट चालकांचे प्रबोधन केले आणि नियम पाळणाऱ्यांना चॉकलेट आणि गुलाब पुष्प दिले.
4. लष्कर वाहतूक विभाग - API विद्या सावंत यांच्या टीमने देसाई हॉस्पिटलच्या मदतीने 27 रिक्षा चालक, 55 स्कूल बस चालक आणि अंमलदार अशा 82 जणांचे नेत्र तपासणी शिबीर घेतले.
5. वानवडी वाहतूक विभाग - PI संगीता जाधव यांच्या टीमने पुणे सोलापूर रोडवर टर्फ क्लब ते भैरोबा नाला चौक दरम्यान पडलेले खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित आणि सुरळीत केला.
पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांनी सांगितले की वाहतूक नियमांचे पालन ही फक्त कायदेशीर नाही तर सामाजिक जबाबदारी आहे.