पुणे - वाहन नोंदणी, लर्निंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्स काढताना तुम्हाला त्रास झाला का. RTO च्या कामात अडचण आली का. परिवहन सेवेबाबत तुमचा अनुभव कसा होता. आता तुम्ही तुमचा अभिप्राय थेट केंद्र सरकारला कळवू शकता. यासाठी नागरिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागामार्फत National e-Governance Service Delivery Assessment म्हणजेच NeSDA 2025 अंतर्गत हे नागरिक सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश परिवहन सेवा पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांकडून अभिप्राय घेणे हा आहे.
कोणत्या सेवांबाबत अभिप्राय द्यायचा
वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती म्हणजेच लर्निंग लायसन्स जारी करणे आणि वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे या तीन सेवांबाबत नागरिकांना अभिप्राय नोंदवायचा आहे. तुम्ही या सेवांपैकी कोणतीही सेवा घेतली असेल तर तुम्ही या सर्वेक्षणात सहभागी होऊ शकता.
अभिप्राय कसा नोंदवावा
या सर्वेक्षणाची लिंक NeSDA Way Forward पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध आहे. नागरिकांना खालील लिंकद्वारे थेट अभिप्राय नोंदविता येणार आहे.
नागरिक सर्वेक्षण लिंक - https://forms.gle/MPDGVJ&KPBnMKSEA
ही लिंक उघडल्यानंतर तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारले जातील. तुम्हाला मिळालेली सेवा कशी होती, वेळेत काम झाले का, अधिकाऱ्यांचे वर्तन कसे होते, ऑनलाईन प्रक्रिया सोपी होती का याबाबत प्रश्न असतील. फक्त 2 मिनिटात तुम्ही हा फॉर्म भरू शकता.
शेवटची तारीख कोणती
सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती या सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी दिलेल्या लिंकद्वारे आपला अभिप्राय नोंदवून सर्वेक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तुमच्या एका अभिप्रायामुळे परिवहन सेवा अधिक सोपी आणि जलद होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा फॉर्म नक्की भरा आणि इतरांनाही शेअर करा.