अहमदाबादमध्ये पावसाचा इशारा; RCB ला न खेळताच ट्रॉफी मिळणार का? IPL फायनलपूर्वी मोठी चर्चा. - टॉप न्यूज मराठी

आयपीएल २०२६च्या फायनल सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे, पण ही उत्सकता अहमदाबादचा पाऊस खराब करणार का? ही भीती सुद्धा आहे. 

आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्याची क्रिकेट चाहत्यांना लागलेली उत्सुकता आता शिखरावर पोहोचली आहे. ३१ मे रोजी अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंगर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात विजेते पदासाठी महामुकाबला होणार आहे. क्यालिफायर-1 मध्ये आरसीबीने गुजरातचा 92 धावांनी पराभव केला असून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गुजरातने क्वालिफायर-2 मध्ये पुनरागमन करत फायनल मध्ये पोहोचले. मात्र या मोठ्या सामण्यापूर्वि एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. फायनलमध्ये पावसाचे संकट आले आणि सामना होऊ नाही शकला, तर विजेता कोण आणि कसा ठरणार?

आयपीएलच्या नियमांनुसार अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर 31 मे रोजी पावसामुळे  मॅच होऊ शकली नाही किंवा मध्येच थांबविण्यात आली तर पुढील दिवशी म्हणजे 1 जून ल मॅच पुन सुरू केली जाईल. अंपायर प्रथम सामना कमी षटकांचा करण्याचा प्रयत्न करतील. दकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियमानुसार निकालासाठी दोन्ही संघांनी किमान 5-5 शतके खेळणे आवश्यक आहे. 5 षटकांचाही सामना शक्य झाला, तर मैदानावरील निकलावरच विजेता ठरेल. 

  सर्वात वाईट परिस्तिती 31 मे आणि 1 जून हे दोन्ही दिवस पावसामुळे पूर्णपणे वाया गेले आणि 5-5 षटकांचाही सामना होऊ शकला नाही आणि सुपर ओवरलाही संधि मिळाली नाही तर ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये विभागली जाणार नाही. अशावेळी लीग टप्प्यातील गुंतलिकेचा नियम लागू होतो. लीग स्टेज मध्ये ज्या संघाने अव्वल स्थान मिळवले असेल, त्याला थेट विजेता घोषित केले जाते. लीग फेरी संपल्यानंतर अरसीबी संघ +0.783 या उत्कृष्ट नेट रनरेटसह गुंतलिकेत पहिल्या क्रमांकावर होता. त्यामुळे जर फायनल सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही तर अरसीबीला आयपीएल 2026 चा विजेता घोषित करण्यात येईल. 

गुजरातमध्ये 30 मे पासून प्री-मान्सून पाऊसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार संबरकांठा, मेहसाणा, गांधीनगर, महिसगर, खेडा, अहमदाबाद आणि इतर काही भागात पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 31 मेच्या संध्याकाळी अहमदाबादला हवामान तुलनेने अनुकूल राहण्याचा अंदाज आहे. आकाशात सुमारे 28 टक्के ढग असतील, तर पावसाची शक्यता केवळ 2 टक्के इतकी आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ही बातमी दिलासा देत असून फायनल सामना विनाअडथळा पार पडण्याची दाट शक्यता आहे.

#topnewsmarathi #ipl2026 #topnews #rcbvsgt #trending