2026 आयपीएल फायनल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये अरसीबीने पुन्हा एकदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले आणि आयपीएल 2026 चॅम्पियन झाले.
आयपीएल 2026 चा सामना 31 मे 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यात दमदार फलंदाजी करत अरसीबीने गुजरात विरुद्ध विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये अरसीबी 5 विकेट्सने जिंकून एतिहास रचला आहे.
आयपीएल 2026 फायनल सामन्यामध्ये अरसीबीने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सामन्यामध्ये गुजरातने पहिली फलंदाजी करत 8 गडी गमावून अवघ्या 156 धावांचे लक्ष अरसीबी समोर ठेवले. हे लक्ष अरसीबीने 18 ओव्हर मध्ये पूर्ण केले. गुजरात टायटन्सवर 5 विकेट्स ने मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. गुजरातने वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर अरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अरसीबीने हे आव्हान 18 ओव्हर मध्ये 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. अरसीबीने 18 ओव्हमध्ये 5 गडी गमावून 161 धावा केल्या आणि पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. विराट कोहली विजयाचा हिरो ठरला. विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली. तर इतरांनीही बॅटिंग आणि बॉलिंगसह योगदान दिलं.
अरसीबीची फलंदाजी
इम्पॅक्ट प्लेयर वेंकटेश अय्यर आणि विराट कोहळी या जोडीने वेगवान सुरुवात केली. विराट-वेंकटेशने 4.3 ओव्हरमध्ये 62 धावा जोडल्या. गुजरातने त्यानंतर सलग 2 ओव्हरमध्ये अरसीबीला झटके दिले. अरसीबीने पहिली विकेट वेंकटेशची गमावली. वेंकटेशने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कल यांनी 1 रन करून आपली विकेट गमावली.
राशिद खानची जोरदार गोलंदाजी.
राशीद खानने अरसीबीला नवव्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. राशीदने कॅप्टन रजत पाटीदार 11 आणि कृणाल पंड्या याला 1 रनवर आउट केलं. त्यानंतर टीम डेव्हिड यांनी विराटला चांगली साथ दिली. विराट आणि टीम डेव्हिडने 31 बॉल मध्ये 41 रन्स केले. टीम ने 24 धावंचं योगदान दिलं. तर विराट आणि जितेश शर्मा या दोघांनी 29 रन्सची भागीदारी करून अरसीबीला विजयी केलं. जितेशने नॉट आउट 11 रन्स केल्या तर विराटने सर्वाधिक योगदान दिलं. विराटने 42 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आउट 75 रन्स केल्या. तर गुजारतसाठी राशीद खान व्यतरिक्त अर्शद खान, मोहम्मद सिराज आणि कगिसो रबडा यांने 1-1 विकेट मिळवली.
पहिला डाव.
गुजरातने टॉस गमावला आणि बॅटिंगसाठी मैदानावर उतरली. मात्र गुजारतसाठी वॉशिंग्टन सुंदर याचा वगळता इतरांना काही खास करता आलं नाही. साई सुदर्शन आणि कॅप्टन शुभमन गिल या दोघांनी निराशा केली. अरसीबीच्या गोलंदाजांनी या दोघांना झटपट आउट करून मैदानाबाहेरचा रास्ता दाखवला. गुजारतसाठी निशांत सिंधु याने 20 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक आणि नाबाद 50 धावा केल्या. सुंदरच्या खेळीमुळे गुजारतला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 रन्स करता आल्या. अरसीबईसाठी रसिख सलाम डार याने तिघांना आउट केलं. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 1 विकेट मिळवली, तर कृणालने 1 विकेट मिळवून योगदान दिलं.
अरसीबीने या विजायसह खास कामगिरी करून दाखवली आहे. अरसीबी आयपीएल स्पर्धेत 2 ट्रॉफी जिंकणारी चौथी टीम ठरली आहे. ह्याआधी चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, आणि कोलकाता नाइट रायडर्स या 3 संघांनी 2 वेळी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच अरसीबी सुद्धा आता सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली आहे.
#trending #iplfinal #topnewsmarathi #rcb #topnews #