पुणे,पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार ? PMRDA कडून तब्बल ११ प्रकल्प हाती - टॉप न्यूज मराठी

पुणे,पिंपरी-चिंचवड करांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी या उद्देशानं PMRDA कडून तब्ब्ल ११ मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहे.  

 रिंग रोड (Ring Road):

प्रादेशिक योजनेतील रिंग रोडसाठी प्रकल्प अहवाल, प्रत्यक्ष काम आणि भूसंपादनासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'विशेष उद्देश वाहन' (SPV) मधील भांडवली सहभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी एकूण ५,५००.०० लक्ष रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

---

२. मेट्रो प्रकल्प (शिवाजीनगर ते हिंजवडी):

शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारचा 'व्हीजीएफ' (VGF) वाटा, युटिलिटी शिफ्टिंग आणि सल्लागार शुल्काचा यात समावेश आहे. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या मेट्रो प्रकल्पासाठी एकूण १४,०८०.०० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

---

३. रस्ते विकास:

औद्योगिक क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी २,५००.०० लक्ष रुपयांची तरतूद आहे.

नागरी विकास केंद्रांना (Urban Growth Centers) जोडणाऱ्या रस्त्यांसाठी १०,०००.०० लक्ष रुपये प्रस्तावित आहेत.

प्राधिकरण क्षेत्रातील आरपी, डीपी, सीएमपी, सीपीटीएस रस्त्यांच्या कामांसाठी १५,०००.०० लक्ष रुपयांची तरतूद आहे.

प्राधिकरण क्षेत्रात पूल, सब-वे, रस्ते आणि रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी १५,०००.०० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

---

४. सीएम पॅकेजमधील रस्ते विकास:

माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार मंजूर रस्त्यांच्या कामांसाठी सन २०२५-२६ च्या सुधारित अंदाजात ९,०००.०० लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती.

----

५. कात्रज-येरवडा ट्विन टनेल (PMR Tunnel):

प्राधिकरण क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या टनेल प्रकल्पासाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ५००.०० लक्ष रुपयांची तरतूद आहे.

---

६. लोणावळा स्कायवॉक:

लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकास आणि स्कायवॉक उभारणीसाठी सन २०२६-२७ करता ५,०००.०० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

---

७. पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प:

इंद्रायणी नदी सुधारणेसाठी १०,०००.०० लक्ष आणि पवना नदी सुधारणेसाठी ४,०००.०० लक्ष रुपयांची तरतूद आहे.

मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी २२०.०० लक्ष रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.

---

८. अर्बन ग्रोथ क्लस्टर (ड्रेनेज व सांडपाणी):

नागरी विकास केंद्रांतर्गत मलनि:सारण (STP) प्रकल्पांसाठी सन २०२६-२७ मध्ये २०,०००.०० लक्ष रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

----

९. तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास रस्ते:

धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ३,०००.०० लक्ष आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ३,०००.०० लक्ष, अशा एकूण ६,०००.०० लक्ष रुपयांच्या कामांचे नियोजन आहे.

----

१०. गृहनिर्माण प्रकल्प (Housing Projects):

पेठ क्र. १२ मधील गृहनिर्माण योजना आणि वाल्हेकरवाडी येथील प्रकल्पांसह 'गृहयोजना व इतर बांधकामे' या संपूर्ण विभागासाठी सन २०२६-२७ करता एकूण ३६,५८९.७० लक्ष रुपयांची तरतूद आहे.

----

११. सार्वजनिक सोयीसुविधा (Public Amenities):

सार्वजनिक सोयीसुविधांच्या (Public Amenities) विकासासाठी ५००.०० लक्ष रुपयांची तरतूद आहे.

क्रीडा पायाभूत सुविधा (Sports Infrastructure) उभारणीसाठी ३,०००.०० लक्ष रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.