करियर बीरियर ! NEET आणि JEE शिवाय पण आहेत करिअरचे 5 जबरदस्त पर्याय, 12 वी नंतर मिळेल लाखोंचे पॅकेज - टॉप न्यूज मराठी

करियर बीरियर ! बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की 12 वी Science नंतर NEET किंवा JEE नाही झाली तर करिअर संपले. पण हे खरे नाही. या दोन परीक्षांव्यतिरिक्त असे अनेक कोर्स आहेत ज्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आणि समाजात मान पण मिळवू शकता.

1. BSc Nursing आणि Paramedical Courses

NEET मध्ये कमी मार्क्स मिळाले तरी तुम्ही डॉक्टरकीच्या क्षेत्रात राहू शकता. BSc Nursing हा 4 वर्षांचा कोर्स आहे. यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी मिळते, पगार 40 हजार पासून सुरु होतो. परदेशात तर या कोर्सला खूप मागणी आहे. 

यासोबतच BMLT (Lab Technician), Radiology, Physiotherapy, Optometry असे Paramedical कोर्स आहेत. हे 3 वर्षांचे असतात आणि 12 वी नंतर थेट प्रवेश मिळतो. प्रायव्हेट लॅब आणि हॉस्पिटलमध्ये यांना कायम मागणी असते.

2. http://B.Pharmacy आणि http://D.Pharmacy

औषध क्षेत्रात जायचे असेल तर हा बेस्ट पर्याय आहे. 12 वी मध्ये PCB किंवा PCM असेल तर तुम्ही Pharmacy करू शकता. http://B.Pharmacy 4 वर्षांचा कोर्स आहे. यानंतर तुम्ही स्वतःचे मेडिकल स्टोअर टाकू शकता किंवा मोठ्या औषध कंपन्यांमध्ये Researcher, Quality Control Officer म्हणून काम करू शकता. भारतात फार्मा इंडस्ट्री खूप मोठी आहे.

3. BSc Data Science, Artificial Intelligence आणि Cybersecurity

तुम्हाला जर Computer आवडत असेल आणि JEE करायचे नसेल तर हे नवीन युगाचे कोर्स आहेत. Data Science आणि AI हे सध्याचे सर्वात जास्त पगार देणारे क्षेत्र आहे. 12 वी नंतर BSc IT, BCA किंवा थेट BSc in AI Data Science करता येतो. यात कोडिंग शिकून तुम्ही 12 लाखांपर्यंतचे पॅकेज फ्रेशर म्हणून घेऊ शकता. IIT ची गरज नाही, Skill महत्वाचे आहे.

4. BSc Agriculture आणि Veterinary Science

शेती हा विषय कमी लेखू नका. BSc Agriculture करून तुम्ही Agriculture Officer, Bank मध्ये Field Officer होऊ शकता. MPSC मार्फत कृषी अधिकारी झालात तर सरकारी नोकरी पक्की. यासोबतच जर प्राण्यांची आवड असेल तर पशुवैद्यकीय म्हणजे Veterinary कोर्स करू शकता. ग्रामीण भागात यांना खूप मागणी आहे.

5. Commercial Pilot, Merchant Navy आणि Designing Courses

वेगळे काहीतरी करायचे असेल तर हे पर्याय आहेत. 12 वी नंतर Commercial Pilot Training करून तुम्ही पायलट होऊ शकता, जरी खर्च जास्त असला तरी पगार लाखोंमध्ये आहे. Merchant Navy मध्ये 12 वी नंतर DNS कोर्स करून जहाजावर जाऊ शकता. आणि ज्यांना Drawing ची आवड आहे त्यांच्यासाठी http://B.Des (Fashion Designing, Interior Designing, Product Designing) हा खूप चांगला पर्याय आहे. NIFT आणि NID सारख्या कॉलेजमधून Designing केले तर मोठ्या ब्रँडमध्ये नोकरी मिळते.

NEET JEE हाच एकमेव मार्ग नाही. तुमच्या आवडीचा कोर्स निवडा आणि त्यात 100 टक्के द्या, यश नक्की मिळेल.