देशातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी 'नीट यूजी २०२६' (NEET-UG 2026) परीक्षा अखेर केंद्र सरकारने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
3 मे रोजी झालेली ही परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर आणि संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर रद्द करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी 'सीबीआय'कडे (CBI) सोपवली आहे.
3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र, आता परीक्षेची पुढची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. नीट परीक्षा 2026 प्रकरणी अखेर सीबीआयने चाैकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआयकडून या प्रकरणी आता चाैकशी केली जाणार आहे. नवीन परीक्षेची तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.