पुणे म्हटलं की IT हब. हिंजवडी, मगरपट्टा, खराडीमध्ये लाखो तरुण काम करतात. पण सध्या या तरुणांसाठी एक वाईट बातमी आहे. पुन्हा एकदा IT कंपन्यांमध्ये लेऑफचे वादळ घोंघावत आहे, आणि यावेळी कारण मंदी नाही तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे.
2025 मध्ये कंपन्यांनी कोरोना काळात केलेल्या जास्त भरतीमुळे नोकरकपात केली होती. पण 2026 ची लेऑफ वेगळी आहे. याला एक्सपर्ट `Silent Layoff` म्हणत आहेत. म्हणजे थेट कंपनी जाहीर करत नाही की आम्ही लोकांना काढतोय, तर Performance च्या नावाखाली, Skill कमी आहे म्हणून हळूहळू लोकांना काढलं जातंय.
आकडे काय सांगतात? भारतातील टॉप 5 IT कंपन्या - TCS, Infosys, HCLTech, Wipro आणि Tech Mahindra यांनी FY26 मध्ये मिळून 7,389 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गेल्या वर्षी याच कंपन्यांनी 12 हजार लोकांना नोकरी दिली होती, पण यावर्षी ग्राफ निगेटिव्ह झाला आहे.
यात सगळ्यात मोठा धक्का TCS ने दिला. देशातील सगळ्यात मोठी कंपनी TCS ने एकट्याने 23,460 कर्मचाऱ्यांना कमी केले आहे, तर काही रिपोर्टनुसार कंपनीने 12,000 लोकांना काढण्याची अधिकृत घोषणा केली होती. CIEL HR या संस्थेच्या अंदाजानुसार 2026 च्या शेवटपर्यंत भारतात 18,000 ते 21,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, आणि 2025-26 मिळून हा आकडा 43,000 पर्यंत जाईल. तर TeamLease म्हणते की हा आकडा 35,000 पर्यंत जाऊ शकतो.
कंपन्या आता `Scale` पेक्षा `Skill` वर भर देत आहेत. ज्या कामांमध्ये AI काम करू शकतो, जसे की बेसिक कोडिंग, टेस्टिंग, सपोर्ट, कॉल सेंटर, ती कामं आता माणसांकडून काढून घेतली जात आहेत. कंपन्यांना आता AI, Cloud Computing, Cybersecurity येणारे लोक हवे आहेत.
पुण्यात जवळपास 4 लाख IT कर्मचारी आहेत. TCS चा सह्याद्री पार्क, Infosys चा हिंजवडी कॅम्पसमध्ये याचा सगळ्यात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. Mid-level मॅनेजर, ज्यांचे पॅकेज जास्त आहे आणि 8-12 वर्षांचा अनुभव आहे, त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे.
यावर उपाय एकच - Upskilling. फक्त जुन्या टेक्नॉलॉजीवर राहून चालणार नाही. AI Tools, Python, Data Science शिकणं आता गरजेचं झालं आहे, नाहीतर पुढचं वादळ आणखी मोठं असणार आहे.
माहिती स्रोत - इंटरनेट