इगतपुरीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या इगतपुरी पोलिसांनी
अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, या चोरीसाठी आरोपींनी बुरख्याचा आधार घेतला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेपुढे त्यांचा हा बनाव टिकू शकला नाही.
बोरटेंभे परिसरात एका घरात महिला एकटी असल्याचे पाहून या चोरट्यांनी डाव साधला होता. बुरखा परिधान करून आलेल्या या आरोपींनी घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
घटनेची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान,
त्याच परिसरात राहणाऱ्या एका पुरुष आणि महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला अडीच तोळे सोन्याचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.