लग्न म्हटले की मुलींची तयारी, फेशियल, मेकअप याचीच चर्चा होते. पण आजकाल मुलंही तितकीच काळजी घेतात. फोटो, व्हिडिओ आणि स्टेजवर चेहरा फ्रेश दिसावा असे प्रत्येक मुलाला वाटते. महागड्या पार्लरमध्ये जाऊन ब्लीच किंवा जास्त केमिकल लावण्यापेक्षा घरच्या घरी 15 दिवसांचा सोपा रुटीन फॉलो केला तर चेहरा नक्की चमकेल.
हा रुटीन 3 भागात आहे - सकाळ, संध्याकाळ आणि आठवड्यातून दोन वेळा करायच्या गोष्टी
सकाळी उठल्यावर चेहरा साध्या पाण्याने धुवा, साबण वापरू नका. त्यानंतर सौम्य फेसवॉश वापरा. मुलांच्या त्वचेवर तेल जास्त असते त्यामुळे जेल बेस फेसवॉश चांगला. फेसवॉश नंतर गुलाब पाणी टोनर म्हणून लावा. हे नैसर्गिक टोनर आहे. शेवटी सनस्क्रीन लावायला विसरू नका. मुलं सनस्क्रीन लावत नाहीत ही मोठी चूक आहे. घराबाहेर 20 मिनिटे आधी SPF 30 असलेले सनस्क्रीन लावा. रात्री घरी आल्यावर पुन्हा फेसवॉशने चेहरा धुवा. दिवसभराची धूळ निघून जाईल. रात्री झोपताना हलके मॉइश्चरायझर लावा. जास्त तेलकट क्रिम नको, एलोवेरा जेल बेस मॉइश्चरायझर उत्तम.
या दिवसात आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करायचा आहे. एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि दही मिक्स करून 2 मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा आणि धुवून टाका. यामुळे ब्लॅकहेड्स आणि टॅन कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली बदाम तेल किंवा कोरफड जेल 2 मिनिटे मसाज करा. मोबाईल रात्री 11 नंतर बंद ठेवा, कारण डार्क सर्कलचे मुख्य कारण म्हणजे झोप कमी होणे आणि मोबाईलचा प्रकाश. ओठ फाटत असतील तर रात्री तुप किंवा लिप बाम लावा. मुलं हे विसरतात पण लग्नाच्या फोटोत ओठ फाटलेले चांगले दिसत नाही.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि लिंबू पाणी प्या, यामुळे पोट साफ राहते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. या शेवटच्या टप्प्यात आठवड्यातून एकदा वाफ घ्या. एका भांड्यात गरम पाणी घेऊन 5 मिनिटे चेहरा वाफेवर धरा, नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे छिद्रे साफ होतात. लग्नाच्या 2 दिवस आधी नवीन काहीही ट्राय करू नका. दाढी कटिंग किंवा फेशियल लग्नाच्या आदल्या दिवशी करू नका, कारण रॅश येऊ शकतो. दाढी 3 दिवस आधी करून घ्या.
रोज 3 लिटर पाणी प्या. रोज रात्री 7 ते 8 तास झोप घ्या. चहा कॉफी आणि सिगारेट कमी करा, त्यामुळे त्वचा काळी पडते. जास्त तेलकट, तिखट खाणे टाळा, त्याऐवजी फळे, काकडी, गाजर खा. केसांसाठी रोज तेल लावू नका, दोन दिवसाआडून तेल लावा आणि सौम्य शाम्पू वापरा.
एक चमचा मुलतानी माती, एक चमचा गुलाब पाणी आणि 2 थेंब मध मिक्स करून 10 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहरा त्वरित फ्रेश दिसेल. हा रुटीन महागडा नाही, पार्लरमध्ये 5000 रुपये खर्च करण्यापेक्षा घरात 200 रुपयात होतो. महत्त्वाचे म्हणजे सातत्य ठेवा. सुंदर दिसणे म्हणजे गोरे होणे नाही तर चेहरा स्वच्छ आणि आत्मविश्वास असणे आहे.
टिप - जर तुमच्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स किंवा एलर्जी असेल तर कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी स्किन डॉक्टरांचा सल्ला घ्या.