नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली अजूनही शांत नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलन नंतर आता पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पॅलेट गन पीडित साहिल लोहबच याला घेऊन संसद मार्ग पोलीस ठाणे गाठले.
कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतर आंदोलनात पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास कुठवर आला, हे जाणून घेण्यासाठी आणि FIR दाखल करण्यासाठी राहुल गांधी अर्धा तास पोलीस ठाण्यात होते. पोलिसांकडून ठोस उत्तर न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले.
"विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐका, तक्रार दाखल करा," अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांच्यासोबत पीडित तरुणही बसला असून परिसरात गर्दी जमली आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या समितीत CBI च्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश असून तरुणींवरील हल्ल्याचा अहवाल आधी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.