मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त IAS अधिकारी डॉ. तुकाराम मुंढे Tukaram Mundhe यांनी राज्यात "शून्य तडजोड" मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली FDA ने गेल्या 48 तासांत राज्यभरात भेसळ आणि नियमभंग करणाऱ्यांवर जबरदस्त धडक कारवाई केली आहे.
1.व्हेज आणि नॉन-व्हेज पिझ्झा बनवण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मचा वापर
2.पिण्याच्या पाण्याची अस्वच्छ आणि निकृष्ट व्यवस्था
3.अन्न साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजच्या नियमांचे उल्लंघन
4.परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि पेस्ट कंट्रोलचा अभाव
या तिन्ही आउटलेट्सचे फूड लायसन्स तात्काळ निलंबित करण्यात आले.
केवळ मुंबईच नव्हे तर मलकापूर आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज आउटलेट्सवरही तपासणी करून त्यांचेही परवाने निलंबित केले. ही सर्व आउटलेट्स *ज्युबिलंट फूडवर्क्स* कंपनीअंतर्गत चालवली जातात.
गुरुवारी 14 ऑगस्ट पहाटे FDA ने चेंबूरमधील प्रसिद्ध पार्ले अॅग्रो कंपनीच्या गोदामावर धाड टाकली.
- वेळ: 13 ऑगस्ट सायंकाळी 6 ते 14 ऑगस्ट पहाटे 5 पर्यंत. तब्बल 11 तास झाडाझडती सुरु होती.
- काय सापडले: एक्सपायरी डेट ओलांडलेले फ्रुटी, अॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूस. एकूण 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त.
- कारवाई: संपूर्ण गोदाम सील करण्यात आले. माल वाहतुकीसाठी वापरलेली 2 वाहनेही जप्त. FDA च्या पुढील आदेशापर्यंत येथून कोणत्याही वस्तूची विक्री किंवा वाहतूक करता येणार नाही.
तुकाराम मुंढे यांनी FDA ला नवे बळ दिले आहे. त्यांच्या या कडक आणि पारदर्शी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. "आरोग्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही" असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. FDA ने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही हॉटेल किंवा कंपनीत नियमभंग दिसल्यास त्यांनी थेट FDA च्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.