केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता म्हणजे DA वाढीबाबत मोठी बातमी आहे. पण सत्य काय आहे ते समजून घ्या.
केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी कॅबिनेट बैठकीत DA 3 टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे DA 55 टक्क्यांवरून 58 टक्के झाला. हा वाढीव DA 1 जुलै 2025 पासून लागू झाला आणि कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा फरक ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळाला. याचा फायदा 49 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना झाला.
यानंतर एप्रिल 2026 मध्ये सरकारने पुन्हा DA वाढवला. 22 एप्रिल 2026 रोजी अर्थ मंत्रालयाने DA 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्याचा आदेश काढला. हा वाढीव DA 1 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे. म्हणजे आता सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 60 टक्के दराने DA मिळत आहे. हा लाभ 50.46 लाख कर्मचारी आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना मिळतो आहे.
बेसिक पगार 18000 असेल तर 58 टक्के DA नुसार 10440 रुपये DA मिळायचा, आता 60 टक्के झाल्याने 10800 रुपये मिळणार म्हणजे महिन्याला 360 रुपयांची वाढ. बेसिक पगार 50000 असेल तर जुन्या 58 टक्के नुसार 29000 रुपये DA होता, आता 60 टक्के नुसार 30000 रुपये मिळणार म्हणजे 1000 रुपयांची वाढ
DA वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढतो. आता जानेवारी 2026 चा DA जाहीर झाला आहे. पुढचा DA म्हणजे जुलै 2026 ते डिसेंबर 2026 चा DA दिवाळी आधी म्हणजे ऑक्टोबर 2026 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा DA 60 वरून 62 किंवा 63 टक्के होऊ शकतो असा अंदाज आहे.
7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपला आहे. पण 8 वा वेतन आयोग लागू होईपर्यंत जुन्याच पद्धतीने DA वाढत राहणार आहे. एकदा 8 वा आयोग लागू झाला की सध्याचा DA बेसिक मध्ये मर्ज होऊन DA पुन्हा 0 पासून सुरू होईल.