नाशिकच्या मनमाड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
रस्त्यावरून जाताना वाहनाचा कट लागल्याच्या एका किरकोळ कारणावरून कार चालकाने एका दुचाकीस्वार तरुणावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे.
हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मनमाड शहरातील चोपडा पेट्रोल पंपाजवळ नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. इरफात बेग नावाचा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका सुसाट कारचा त्याच्या दुचाकीला किरकोळ कट लागला.
कारचा कट लागल्यामुळे इरफातने कार चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा कार चालकाला इतका राग आला की, त्याने कसलाही विचार न करता थेट गाडीतून उतरून धारदार चाकू काढला आणि हल्ला केला...