सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली... कराडमध्ये घडलेली ही घटना एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. पहाटेच्या अंधारात एका अभियंत्याला भरधाव कारने उडवलं जातं. सुरुवातीला हा अपघात असल्याचं दिसतं. पण CCTV फुटेज समोर येतं आणि संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश होतो.. कार चालक एकदा नाही, दोनदा नाही तर वारंवार गाडी अंगावर घालत एकाव्यक्तीची हत्या करतो तपासाची चक्रं फिरतात आणि अवघ्या 12 तासांत पोलिस या गुन्ह्याच्या खोलापर्यंत पोहोचतात आणि या खुणा मागे पत्नी आणि मेहुण्याचा हात असल्याचा स्पष्ट होता..
पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे... सुरुवातीला पाहूयात या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज..
शनिवारी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांच्या सुमारास कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर एक भीषण घटना घडली.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण मंडले हे पायी जात असताना एका अल्टो कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर मंडले रस्त्यावर कोसळले. मात्र त्यानंतर जे घडलं ते अधिक धक्कादायक होतं. या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये काय चालक लक्ष्मण मंडले यांना धडक देतो ..
काही क्षणात धडक देऊन गाडी पुढे घेतो..मात्र काही क्षणातच तो पुन्हा मागे येतो.
गाडी रिव्हर्स घेतो आणि जखमी अवस्थेत पडलेल्या लक्ष्मण मंडले यांच्या अंगावरून घालतो.एवढ्यावरच न थांबता पुन्हा एकदा कार पुढे नेत त्यांना चिरडल्याचं CCTV मध्ये कैद झालं आहे.त्यानंतर आरोपी मंडले यांची बॅग घेऊन फरार झाल्याचंही दिसतं.सुरुवातीला अपघाताचा संशय असताना कराड शहर पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी केली.आणि अवघ्या 12 तासांत तपासाला मोठं यश मिळालं.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लक्ष्मण मंडले आणि त्यांच्या पत्नीमध्ये काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते.याच वादातून पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांनी कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,लक्ष्मण मंडले हे शहापूर (जि. ठाणे) येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. ते ५ जून रोजी रात्री ठाण्याहून बसने कराडला येत असल्याची माहिती त्यांनी पत्नी सुरेखा मंडले यांना दिली होती. पहाटे कोल्हापूर नाका येथे घेण्यासाठी येण्यासही सांगितले होते.मात्र पती-पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून पत्नी सुरेखा मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांनी एक महिन्यापूर्वी पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दोघांनी काही व्यक्तींना सुपारी देऊन लक्ष्मण मंडले यांच्या हालचाली व लोकेशनची माहिती पुरवली आणि त्यानुसार हा कट राबविण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.यानंतर अपघाताचा बनाव रचून भररस्त्यात हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.या प्रकरणात पत्नी आणि मेहुण्याला ताब्यात घेण्यात आलं असून प्रत्यक्ष हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.या हत्याकांडातील मुख्य मारेकरी अद्याप फरार आहेत.
त्यांच्या शोधासाठी कराड शहर पोलिसांची तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी एकूण पाच विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.सुपारीची रक्कम किती होती?
हत्येमागचं नेमकं कारण काय?आणि या कटात आणखी कोण सहभागी आहे?या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलिस तपासातून समोर येणार आहेत.
कराड शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाऊ शकतो का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.. प्रकरणात मयत व्यक्तीच्या पत्नी आणि मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या प्रकरणाचा प्रत्यक्ष मारेकरी सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.. मयत व्यक्तीच्या पत्नी आणि मेव्हण्याच्या चौकशीतून आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे...