"नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र, आता या प्रपासाला एक अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक वळण मिळालं आहे. पोलिसांच्या हाती आता असे पुरावे लागले आहेत, ज्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होणं अटळ मानलं जात आहे."
पोलिसांनी केलेल्या कसून तपासात आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आले आहेत. तब्बल १५ ते २० ग्रामस्थांचे जबाब पोलिसांनी नोंदवले असून, यामुळे गुन्ह्याची साखळी जोडण्यास मदत झाली आहे.
धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, जेव्हा आरोपी चिमुकलीला मंदिरातून घेऊन जात होता, तेव्हा काही लहान मुलांनी हे पाहिलं होतं. केवळ पाहिलं नाही, तर या मुलांनी गोठ्यात जाऊन त्या नराधमाला अडवण्याचा प्रयत्नही केला.चिमुकल्या मुलांनी जेव्हा विरोध केला, तेव्हा त्या नराधमाने त्यांना दगड मारून तिथून पळवून लावलं
"या प्रकरणात महत्त्वाचं म्हणजे, पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लहान मुलांची 'ई-साक्ष' (E-Testimony) नोंदवली आहे. लहान मुलांच्या मनावर झालेला परिणाम आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही प्रक्रिया पार पडली आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर, प्रत्यक्षदर्शींच्या या साक्षीमुळे ही केस कायदेशीरदृष्ट्या अत्यंत मजबूत झाली आहे."