मोठी बातमी : दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत, वडिलांनी CBI समोर आदित्य ठाकरेंचे नाव घेताच.... कनेक्शन काय ? - टॉप न्यूज मराठी

MUMBAI : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआय कार्यालयात आपला जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्यांनी मुलीच्या मृत्यूबाबत आपल्याकडे असलेली माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. सीबीआयने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याचा दावा सतीश सालियान यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

जबाब नोंदवताना सतीश सालियान यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता सूरज पांचोली, अभिनेता डिनो मोरिया आणि काही बॉडीगार्ड्सची नावे घेतली आहेत. आपल्या मुलीसोबत जे घडले ते सर्व सत्य आपण सीबीआयला सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. जबाबानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांना तात्काळ अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी सीबीआयकडे केली आहे.

सतीश सालियान म्हणाले की जे फॅक्ट आहे तेच मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. सत्याचा कधीही पराभव होत नाही आणि जिथे सत्य असते तिथे देव असतो, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांचे कनेक्शन काय?

दिशा सालियान ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी मुंबईत एका इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यावेळी याला आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू म्हटले होते. मात्र या मृत्यूनंतर काही दिवसांनीच सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाल्याने दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडली गेली. भाजप आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव सातत्याने घेतले होते. त्या रात्री झालेल्या पार्टीत आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि त्यानंतर दिशा सालियानचा मृत्यू झाला असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी हे सर्व आरोप अनेकदा फेटाळून लावले आहेत आणि हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सतीश सालियान यांनी यापूर्वी तपासात त्रुटी असल्याचा आरोप करत नव्याने एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता सीबीआय या जबाबाच्या आधारे कोणाची चौकशी करते आणि पुढे काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.