नीट पेपरफुटी प्रकरण! आरोपी शुभम खैरनार घराची CBI कडून झाडाझडती; काय-काय मिळालं? - टॉप न्यूज मराठी

‎देशभर गाजत असलेल्या NEET पेपर लीक प्रकरणाचा तपास आता अधिक गतिमान झाला आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या शुभम खैरनारच्या नांदगाव येथील निवासस्थानी काल सीबीआयच्या पथकाने धडक दिली. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सीबीआय आणि स्थानिक पोलिसांचे पथक शुभमच्या घरी दाखल झाले आणि तिथूनच सुरू झाला तपासाचा पुढचा टप्पा.

‎

‎

‎मिळालेल्या माहितीनुसार, ही चौकशी तब्बल चार तास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू होती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुभमच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. घराच्या कानाकोपऱ्याची झडती घेण्यात आली. रात्री ११ वाजेपर्यंत हे पथक याठिकाणी तळ ठोकून होते. या चार तासांच्या प्रदीर्घ कारवाईनंतर सीबीआयने घरातून काही महत्त्वाचे साहित्य आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.शुभम खैरनार याला कालच सीबीआयने ताब्यात घेतले होते. त्यानंतर तातडीने ही शोधमोहीम राबवण्यात आली. पेपर लीक प्रकरणातील आर्थिक व्यवहार किंवा इतर काही महत्त्वाचे पुरावे या झाडाझडतीतून हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की, पथक रवाना होईपर्यंत स्थानिक परिसरातही तर्कवितर्क लढवले जात होते.NEET परीक्षेतील गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असताना, आता सीबीआयच्या या कारवाईतून कोणते नवीन खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जप्त केलेल्या साहित्यातून या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, हे स्पष्ट होईल का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.