मुंबई : नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. महाराष्ट्र पोलीस दहशतवादी विरोधी पथक एटीएसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीमध्ये शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगरा गॅंग यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात असलेल्या शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंभरहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आला असून हे सर्वजण गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोंगरा गॅंगशी संपर्कात होते. या तरुणांना पैशांचं अमिष दाखवून फुस लावण्यात आली असं सांगितलं जात असून धक्कादायक म्हणजे या तरुणांमार्फत गुन्हेगारीचे कट आणि शस्त्रांची तस्करी केली जात होती. अशा दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान आणि इतर देशांमधून फंड देखील पुरवला जात असल्याचं समजते आहे. दरम्यान या संशयीतांकडून लॅपटॉप मोबाईल अशी तांत्रिक साधने जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा एक पाकिस्तानी गँगस्टर असून लाहोरमध्ये राहतो. सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शहजाद भट्टी याच्यावर आतापर्यंत भारतीय दहशतवादी नेटवर्क वाढवणे, हेरगिरीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल असून सध्या तो दुबईतून नेटवर्क चालवत असल्याच देखील समजते आहे. त्याचबरोबर जुन्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील सूत्रधार झिशान अख्तर याला देशाबाहेर पळवून नेण्यास शहजाद भट्टी याचाच हात होता.