करियर गायडन्स : AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती सगळीकडे आहे. पण घाबरण्याची गरज नाही. ए आय नोकरी घेणार नाही तर AI येणाऱ्या व्यक्ती तुमची नोकरी घेईल. त्यामुळे वेळीच योग्य कोर्स शिकणे खूप महत्त्वाचे आहे. पुढील 10 वर्षे ज्या कोर्सला सर्वात जास्त मागणी राहणार आहे असे 5 बेस्ट कोर्स कोणते आहेत ते पाहूया.
1. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कोर्स (Artificial Intelligence and Machine Learning Course)
हा सगळ्यात महत्त्वाचा कोर्स आहे. पुढील काळात प्रत्येक कंपनीला AI एक्सपर्ट लागणार आहे. यामध्ये तुम्ही चॅटबॉट बनवणे, डेटा शिकवणे, ऑटोमेशन कसे करायचे हे शिकता. 12 वी नंतर किंवा कोणत्याही पदवीनंतर तुम्ही 6 ते 12 महिन्यांचा हा कोर्स करू शकता. भारतात AI इंजिनिअरला सुरुवातीलाच 8 ते 12 लाखांचे पॅकेज मिळते.
2. डेटा सायन्स आणि डेटा अॅनॅलिटिक्स (Data Science and Data Analytics)
आज डेटा हेच नवीन तेल आहे. प्रत्येक कंपनीकडे हजारो ग्राहकांचा डेटा असतो पण त्याचा वापर कसा करायचा हे त्यांना कळत नाही. डेटा सायंटिस्ट तो डेटा वाचून कंपनीला फायदा कसा होईल हे सांगतो. एक्सेल, पायथॉन, पॉवर बी आय हे यात शिकवले जाते. हा कोर्स करून तुम्ही बँक, हॉस्पिटल, ई-कॉमर्स अशा सर्व ठिकाणी काम करू शकता.
3. सायबर सिक्युरिटी कोर्स (Cybersecurity Course)
जसा इंटरनेटचा वापर वाढतोय तसे ऑनलाईन फ्रॉड सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे सायबर सिक्युरिटी एक्सपर्टची मागणी प्रचंड वाढली आहे. हॅकिंगपासून कंपनीला कसे वाचवायचे, डेटा कसा सुरक्षित ठेवायचा हे यात शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर सरकारी आणि खाजगी दोन्ही ठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी मिळते.
4. डिजिटल मार्केटिंग विथ AI टूल्स Digital Marketing with AI Tools
आता पारंपारिक मार्केटिंग संपले आहे. सर्व जाहिराती इंस्टाग्राम, युट्युब आणि गुगलवर चालतात. AI टूल्स वापरून डिजिटल मार्केटिंग कसे करायचे हे शिकला तर तुम्ही घरबसल्या फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता. यामध्ये एसईओ, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हे शिकवले जाते. कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासाठी हा बेस्ट कोर्स आहे.
5. यूआययूएक्स डिझाईन कोर्स (UI/UX Design Course)
प्रत्येक अॅप आणि वेबसाईट सुंदर आणि वापरण्यास सोपी असावी लागते. हेच काम यूआययूएक्स डिझायनर करतो. AI च्या काळातही क्रिएटिव्ह डिझायनरची गरज कधीच संपणार नाही. तुम्हाला चित्रकला किंवा डिझाईनची आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. यात फिग्मा, अडोब एक्सडी सारखे सॉफ्टवेअर शिकवले जातात.
लक्षात ठेवा डिग्रीपेक्षा स्किलला जास्त महत्त्व आहे. हे कोर्स तुम्ही ऑनलाईन युडेमी, कोर्सेरा किंवा गुगलच्या प्लॅटफॉर्मवरून कमी खर्चात शिकू शकता. आज शिकाल तर उद्या टिकाल.