रेल्वेचा खास नियम! स्लीपर तिकीट असतानाही AC मध्ये प्रवास करण्याची संधी - टॉप न्यूज मराठी

भारतीय रेल्वेने प्रवास करणारे लाखों प्रवासी आहेत. लांबच्या प्रवासासाठी स्लीपर तिकिट बूक केल्या जाते. स्लीपर कोचच्या तिकिटावर एसी कोचमधून प्रवास करता येतो का? रेल्वेचे हे ऑटो अपग्रेडेशन फीचर जाणून घ्या. 

देशभरात लांबच्या प्रवासासाठी आज सुद्धा रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जाते. लांब पळल्यासाठी स्लीपर कोचचे तिकीट बूक करण्यात येते. पण उन्हाळ्यात एसी कोच मिळाला तर अनेकांना हायसे वाटते. तसेच अनेकांना एसी कोचचा प्रवास कारावास वाटतो. स्लीपर कोचचे तिकीट केल्यावर एसी कोचने प्रवास करता येतो का? तर त्याचे उत्तर होय असे आहे. त्यासाठी ऑटो अपग्रेडेशन फीचर तुमच्यासाठी कामाला येते. त्यासाठी काय करावे लागते? जाणून घेऊया. 

ऑटो अपग्रेडेशन फीचेर भारतीय रेल्वेचे एक फीचर आहे. जे तिकीट बूकिंग करताना कामी येईल. या फीचर अंतर्गत विना अतिरिक्त रक्कम देता तुम्हाला तुमचे तिकीट उच्च श्रेणीसाठी अपग्रेड करता येईल. म्हणजे स्लीपर कोचचे तिकीट एसी कोच तिकीटात बदलता येईल. त्यासाठी ऑटो अपग्रेडेशन या फीचरचा वापर करता येईल. 

ही फीचर प्रवाशांना IRCTC या अधिकृत साईट वा अॅपवर तिकीट बूक करताना दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यावर तिथे तुम्हाला ऑटो अपग्रेडेशन फीचर मिळेल. ऑटो अपग्रेडेशन फीचरचा लाभ घेत येतो हे जरी तितकचं खरं असलं तरी एसी कोच मध्ये सीट उपलब्ध असणे आवश्यक आहे. म्हणजे जर एसी कोचमध्ये आसन उपलब्ध असेल तर तुम्हाला त्वरित तिकीट अपग्रेडेशन करता येईल. ही सुविधा केवळ एसी क्लाससाठी मर्यादित आहे. 

जर रेल्वे प्रवासात वेटिंग लिस्ट नसेल तर मग ऑटो अपग्रेडेशन फीचरचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ज्या श्रेणीत तुम्ही तिकीट बुकिंग केले, त्याच श्रेणीत तुम्हाला ती सीट घ्यावी लागते. ऑटो अपग्रेडेशन ही प्रक्रिया पूर्णपणी वेटिंग लिस्टचा परिस्थितीवर अवलंबून आहे.     

#topnewsmarati #indianrailway #topnews #irctcnewrules