पुणे गुन्हे शाखेची कारवाई : अवैध गुटखा-तंबाखू विक्री करणारा इसम जेरबंद, 9.65 लाखांचा मुद्देमाल जप्त - टॉप न्यूज मराठी

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-3 ने मोठी कारवाई करत अवैधरित्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. ही कारवाई शिवणे, देशमुखवाडी परिसरात करण्यात आली.

नेमके काय घडले ?

गुन्हे शाखा युनिट-3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ कदम, पोलीस अंमलदार महेंद्र तुपसुंदर आणि तुषार किंद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. 

माहितीनुसार, देशमुखवाडी, शिवणे, पुणे येथे एक इसम एका रूममधून अवैधरित्या गुटख्याची विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.पोलिसांनी सोमनाथ शामराव गरुड, वय 44 वर्षे, रा. फ्लॅट नं. बी 204, शिंदे पार्क हौसिंग सोसायटी, अचानक चौक जवळ, उत्तमनगर, पुणे याला ताब्यात घेतले. 

त्याच्या ताब्यातून अंदाजे 9,65,484/- रुपये किमतीचा गुटखा आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्विनी सातपुते, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे, निखिल हसन, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-1, राजेश दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

कारवाईत गुन्हे शाखा युनिट-3 चे पोलीस निरीक्षक प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार पांडुरंग शिंदे, एम डी तुपसुंदर, तुषार किंद्रे यांचा सहभाग होता.