अरे बापरे ! चीनमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेले साप पालन केंद्रातील 900 कोब्रा; नागरिकांमध्ये दहशत, गावात आणीबाणी जाहीर - टॉप न्यूज मराठी

चीन : चीनमध्ये सध्या मायसाख नावाच्या वादळांवर थैमान घातला आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू देखील ओढावला आहे. त्याचबरोबर सगळ्यात भयानक घटना घडली आहे ती म्हणजे गुवांगशी प्रांतातील नानिंग शहरांमध्ये, या शहरांमध्ये धरण फुटल्यामुळे स्नेक ब्रीडिंग फार्म मधून सुमारे 900 कोब्रा या पाण्यामध्ये पसरले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुवांगशी प्रांतातील हिंगोली शहरामध्ये डेंगवेई गावात एक मोठे साप पालन केंद्र आहे. दरम्यान धरण फुटल्यामुळे या फार्मवर प्रभाव पडला आणि पुराच्या पाण्यामध्ये तब्बल 900 कोब्रा वाहून गेले आहेत. 

या परिसरामध्ये आता या पाण्यासह पाण्यातील या 900 कोब्रांची देखील भीती मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन या ठिकाणी बचाव कार्य करत असून नागरिकांनी पाण्यापासून दूर राहा आणि घरामध्येच रहा असा सल्ला दिला आहे. सध्या डेंगवे गावामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 

मायसाख या उष्णकटिबंधीय वादळामुळे पुढील काही तास दक्षिण चीनच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अधिकाऱ्यांनी सखल भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.