आरोग्य : आंघोळ करताना आधी डोक्यावर पाणी टाकता की पायावर? 90 टक्के लोक करतात ही जीवघेणी चूक - टॉप न्यूज मराठी

आपण रोज आंघोळ करतो. पण आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती हे तुम्हाला माहित आहे का? बहुतांश लोक आंघोळ करताना थेट डोक्यावर बादलीभर पाणी ओततात. विशेषतः घाईत असताना किंवा थंड पाण्याने आंघोळ करताना आपण हेच करतो. पण डॉक्टरांच्या मते ही पद्धत अतिशय चुकीची आणि धोकादायक आहे.

आधी डोक्यावर पाणी टाकल्याने काय होते?

आपल्या शरीराचे तापमान नेहमी एकसारखे असते. जेव्हा तुम्ही थेट डोक्यावर थंड पाणी टाकता, तेव्हा डोक्यातील रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात. त्यामुळे शरीरातील रक्तदाब अचानक खूप वाढतो.

डॉक्टर याला कोल्ड शॉक रिस्पॉन्स म्हणतात. या अचानक वाढलेल्या रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटण्याचा किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार आहे, त्यांच्यासाठी ही सवय खूपच जीवघेणी ठरू शकते.

अनेक वेळा आंघोळ करताना बाथरूममध्ये चक्कर येणे किंवा पडणे यामागे हेच कारण असते.

योग्य पद्धत कोणती?

आयुर्वेदात आणि विज्ञानातही आंघोळ करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ती म्हणजे आंघोळ नेहमी पायापासून सुरू करावी.

पहिले पायावर पाणी टाका, नंतर गुडघ्यावर, नंतर पोटावर, मग खांद्यावर आणि सर्वात शेवटी डोक्यावर पाणी टाका.

असे केल्याने शरीराचे तापमान हळूहळू थंड पाण्याशी जुळवून घेते. रक्तदाब अचानक वाढत नाही. शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.

गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर?

जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तरीही हाच नियम पाळावा. गरम पाण्यानेही थेट डोक्यावर पाणी टाकल्याने डोक्यातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि चक्कर येऊ शकते.

जपानमध्ये तर या कारणामुळे दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो, त्याला जपानमध्ये हीट शॉक असे म्हणतात.

त्यामुळे लक्षात ठेवा, आंघोळ ही फक्त शरीर स्वच्छ करण्याची क्रिया नाही तर ती आरोग्याशी निगडित आहे. उद्यापासून आंघोळ करताना ही छोटीशी सवय बदला. आधी पायावर पाणी टाका, मग डोक्यावर. ही एक छोटी सवय तुमचा जीव वाचवू शकते.