बंगळुरू : बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी खासदार प्रज्वल रेवन्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा कारागृहात त्यांच्याकडे बेकायदेशीर मोबाईल आढळल्याने खळबळ उडाली आहे.
VIP आणि हाय प्रोफाइल कैद्यांसाठी राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान पोलिसांना रेवन्नाकडे एक मोबाईल सापडला.
- जप्त केलेल्या मोबाईलमध्ये : तब्बल 80 ते 90 डाऊनलोड केलेले पॉर्न व्हिडीओ आणि वर्तमानपत्रातील कमी कपड्यातील महिलांचे फोटो आढळले.
- पोलिसांची कारवाई : मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हे व्हिडीओ कधी आणि कसे डाऊनलोड झाले याचा तपास सुरू आहे.
- नवीन गुन्हा : या प्रकरणी रेवन्नाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रताप राय नावाच्या कच्च्या कैद्यालाही आरोपी करण्यात आले आहे.
इतकी कडक सुरक्षा असताना कारागृहात मोबाईल कसा पोहोचला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवरही बोट उचलले जात आहे.