पुणे - दिवाळीनिमित्त पुणे जिल्ह्यात शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशीऐवजी सोमवार 9 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबर रोजी परिवहन विभागाचे कामकाज बंद राहणार आहे.
9 नोव्हेंबर रोजी सारथी व वाहन प्रणालीवर अनुज्ञप्ती आणि वाहन योग्यता प्रमाणपत्रासंबंधी कामकाजासाठी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. अशा अर्जदारांनी 12 ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत आयडीटीआर, आळंदी रोड किंवा दिवे येथील संबंधित कार्यालयात उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत. या अर्जदारांची 9 नोव्हेंबर रोजीची पूर्वनियोजित वेळ ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा नवीन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही.
तसेच 6 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पक्क्या अनुज्ञप्तीसाठीची पूर्वनियोजित वेळ 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता सारथी प्रणालीवर उपलब्ध होणार आहे. संबंधित अर्जदारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.