मोठी बातमी : कुर्ल्यात क्रेन कोसळल्याने मोठा अपघात; 9 जखमी; सुदैवाने जीवित हानी टळली - टॉप न्यूज मराठी

मुंबई : मुंबईच्या कुर्ला भागातून एक मोठी बातमी समोर येते आहे. कुर्ल्यातील कुरेशी नगरमध्ये आज पहाटे 2:40 वाजता मोठा अपघात. MMRDA च्या साइटवर जेसीबी उचलताना क्रेनचा तोल गेला आणि ती थेट रेल्वेच्या OHE वायर आणि झोपड्यांवर कोसळली. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रेनसोबत जेसीबीही कोसळला आहे. 2 घरे, 1 कार, 1 रिक्षाचे नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. सुरुवातीला या घटनेत 2 नागरिक जखमी झाल्याचे सांगितले गेले होते, दरम्यान, BMC नुसार 9 जण जखमी झाल्याचे कळवण्यात आले आहे. सर्वांना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने जीवितहानी नाही.

दरम्यान , ही क्रेन कुर्ला-ट्रॉम्बे मालवाहू लाईनवर पडली. ही लाईन लोकलसाठी नसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे. अपघाताला MMRDA जबाबदार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. पोलीस तपास सुरू असून सध्या मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.