राग आला, कटरनं खून केला, मृतदेह जाळला... दौंडमध्ये नराधम बापानं 9 वर्षांच्या मुलीला का मारलं ? - टॉप न्यूज मराठी

पुण्याच्या दौंड तालुक्यातील देऊळगावराजे येथे एका धक्कादायक घटना घडली. एका नराधम बापाने स्वतःच्याच 9 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी आता आरोपी बापाला दौंड पोलिसांनी अटक केली. 

शांताराम चव्हाण असं आरोपी बापाचं नाव आहे. शांताराम ला अनामिका आणि संस्कार अशी दोन आपत्य होती. अनामिका ही आरोपीच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. या दोन्ही बहिण भावांचे शाळेचे निकाल लागले होते. संस्कार हा शाळेत पहिला आला होता. मात्र त्याच्या गुणपत्रिकेत काहीतरी खाडाखोड झाली होती. हीच खडाखोड अनामिकाने केल्याचा संशय आरोपी शांताराम ला आला. त्यामुळे दारूच्या निषेध आणि रागाच्या भरात त्याने नऊ वर्षांच्या आपल्याच मुलीला लाकडाने मारहाण केली. त्यानंतर झाड कापायच्या कटरनं तिच्या हातावर गळ्यावर वार करत खून केला. एवढं करूनही हा नराधम शांत बसला नाही. त्याने अनामिका चा मृतदेह साडीत गुंडाळून घरातच जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी येत अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. तर आता दौंड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपी शांताराम ला अटक केली आहे.