करियर बीरियर : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दिवाळीपूर्वी सर्वात मोठी बातमी आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड म्हणजे RRB ने NTPC पदांसाठी 8868 जागांची नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 12 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजे NTPC अंतर्गत भरती होत आहे. यामध्ये ट्रॅफिक असिस्टंट, कमर्शियल कम तिकीट क्लार्क, अकाउंट्स क्लार्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट, ट्रेन्स क्लार्क आणि स्टेशन मास्टर अशी पदे आहेत. ही पदे लेवल 2 आणि लेवल 3 ची आहेत.
12वी पास असले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. कोणत्याही शाखेतून 12वी पास असणे गरजेचे आहे. वय 18 ते 30 वर्षे असावे. ही वयोमर्यादा 1 जानेवारी 2027 रोजी ग्राह्य धरली जाणार आहे. SC ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षे सूट मिळेल.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे आणि 15 ऑक्टोबर 2026 पासून अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी अर्ज सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबर 2026 अशी दोन टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने http://rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. आधार कार्डने व्हेरिफिकेशन करणे यावेळी बंधनकारक केले आहे. तुमच्या आधारवरील फोटो आणि 10वीच्या प्रमाणपत्रावरील माहिती जुळणे गरजेचे आहे.
जनरल, OBC, EWS साठी 500 रुपये फी आहे. SC, ST, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि EBC साठी 250 रुपये फी आहे. CBT परीक्षेला बसल्यावर ही फी परत मिळणार आहे. जनरलला 400 रुपये आणि इतरांना 250 रुपये पूर्ण परत मिळतील.
पहिले CBT 1 परीक्षा, नंतर CBT 2 परीक्षा, त्यानंतर जिथे गरज आहे तिथे टायपिंग स्किल टेस्ट, आणि शेवटी कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्ट होईल.
लेवल 2 साठी सुरुवातीचा पगार 19900 रुपये आणि लेवल 5 साठी 29200 रुपये अधिक DA, HRA मिळून हातात 35000 ते 45000 पर्यंत पगार मिळेल.